Bachchu Kadu : …नाहीतर प्रत्येक गणपती मंडळात दानपेट्या ठेवून ती मदत सचिन तेंडुलकरांना देऊ

Share

आंदोलनकर्त्या बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या एका गोष्टीवर थेट आक्षेप घेतला आहे. सचिन तेंडुलकरच्या ऑनलाइन गेमच्या (Online game) जाहिरातीवरुन पुन्हा एकदा बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसह त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले. मात्र घटनास्थळावरून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जुगारची जाहिरात करू नये, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होतं. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. आंदोलनाचा इशारा देऊनही सचिन तेंडुलकर कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. ‘आमचा क्रिकेटरने जाहिरात करण्याला विरोध नाही तर भारतरत्न (Bharatratna) सन्मानित व्यक्तीने जाहिरात करण्याला विरोध आहे. जर सचिन तेंडुलकर यांच्याकडे भारतरत्न नसता तर आम्ही आंदोलन केलं नसतं’, असंही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

बच्चू कडू काय म्हणाले?

सचिन तेंडुलकरांचे चाहते खूप आहेत. त्यांचे परिणाम लहान मुलांपासून सगळ्यांवर पडत आहेत. त्यामुळे आमची साधी मागणी आहे की एक तर तुम्ही जाहिरातीतून माघार घ्यावी किंवा भारतरत्न परत करावं. हे जर त्यांनी केलं नाही तर येणार्‍या गणेशोत्सवात प्रत्येक मंडळात आम्ही ‘सचिन तेंडुलकर दानपेटी’ ठेवणार आहोत. त्या दहा दिवस ठेवणार आणि मग सगळ्या दानपेट्या महाराष्ट्रातून जमा करुन सचिन तेंडुलकरांना देणार, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना काय पत्र लिहिले?

यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांना पत्रदेखील लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सुरु असून त्यापैकी एक कंपनी पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. भारतरत्न सन्मानानं सन्मानित झालेल्या व्यक्तीनं अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणं लोकांच्या हिताचं नाही. त्यामुळे भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत ही देशवासियांसाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

30 mins ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

60 mins ago

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…

2 hours ago

Mumbai Rains : पावसाचा आमदार आणि मंत्र्यांनाही फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांना ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…

2 hours ago

पुण्यात पून्हा हिट अँड रन; भरधाव कारने दोन पोलिसांना उडवले; एकाचा मृत्यू, एक गंभीर

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…

3 hours ago