नवी दिल्ली : ‘चांद्रयान ३’ (chandrayaan 3) च्या प्रज्ञान रोव्हरमध्ये लावलेल्या एका यंत्राने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे शोधले आहे. हे काम त्यातील पेलोड म्हणजेच लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपीने केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान ३चे पहिले इन सीटू प्रयोग होता. याशिवाय तेथे हायड्रोजन आहे का याचाही शोध घेतला जात आहे. जर ऑक्सिजननंतर हायड्रोजन आढळला तर चंद्रावर पाणी बनणे सोपे होईल.
लिब्स चंद्राच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या तीव्र लेझर किरेणे टाकत त्याचा अभ्यास करते. ही लेझर किरणे अधिक तीव्रतेने दगड अथवा मातीवर पडतात. ज्यामुळे तेथे गरम प्लाम्झा तयार होतात. प्लाझ्मामधून निघणारा प्रकाश हे सांगतो की या पृष्ठभागावर कोणत्या प्रकारची खनिजे आहेत.
चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारच्या खनिजांचा शोध लागला आहे. अॅल्युमिनियम, कॅल्शियम, आर्यन, क्रोमियम, टायटेनियम तसेच मँगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा शोध लागला आहे.
याआधी २८ ऑगस्टला चांद्रयान ३च्या विक्रम लँडरमध्ये लावलेल्या चास्टे पेलोडने चंद्राच्या तापमानाबाबतचे पहिले ऑब्जर्व्हेशन ाठवले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान ५० डिग्री सेल्सियस आहे. तर ८० मिमीच्या खोलीमध्ये -१० डिग्री सेल्सियस इतके आहे.
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य पद्धतीने काम रत आहे. रोव्हरवर दोन पेलोड्स लागले आहेत. पहिला लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्को. हा एलिमेंट कंपोझिशन स्टडी करणार. जसे मॅग्नेशियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त आणि लोह.
दुसरे पेलोड आहे अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर. हा चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले केमिकल्स म्हणजेच रसायनांची मात्रा आणि गुणवत्तेचा अभ्यास करणार आहे. सोबतच खनिजांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…