मान्सूनवर अल निनोचा परिणाम! १२२ वर्षात सगळ्यात कोरडा ऑगस्ट

मुंबई : वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांच्या मते भारतात १९०१ नंतर या वर्षातील ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरडा असण्याची शक्यता आहे. हा परिणाम अल निनोमुळे झाला आहे. याशिवाय या वर्षी मान्सून २०१५ नंतर अधिक कोरडा असू शकतो. ज्यात १३ टक्के कमी पाऊस झाला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. १९०१ सालानंतर भारतातील हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्टमध्ये २५४.९ मिमी पाऊस होतो जो एकूण पावसाच्या ३० टक्के इतका आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार भारतात ऑगस्ट २००५मध्ये २५ टक्के, १९६५मध्ये २४.६ टक्के, १९२०मध्ये २४.४ टक्के, २००९मध्ये २४.१ टक्के आणि १९१३मध्ये २४ टक्के इतका कमी पाऊस झाला होता.


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचे मुख्य कारण अल निनोचा प्रभाव आहे. पावसाचा जोर कमी असण्याची ही स्थिती एका महिन्यापासून आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. तसेच काही दिवसांनी भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.



जुलै २००२मध्ये पावसामध्ये ५०.६६ टक्के झाली होती घट


आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र म्हणाले, आम्ही २ सप्टेंबरला पावसामध्ये सुधारणेची अपेक्षा करत. कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने भारताच्या पूर्व, मध्य आणि दक्षिण भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. याआधी २००२मध्ये जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटले होते. त्यावर्षी जुलैमध्ये पावसाच्या प्रमाणात ५०.६ टक्के घट झाली होती.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या