
पुणे : पुण्यातील (Pune) गणेशोत्सव मंडळांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेतली. यावेळी मिरवणुका वेळेत पार पाडण्याची विनंती गणपती मंडळांना केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो (Pune Metro) ही रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
त्याचबरोबर विसर्जन वेळेवर होण्यासाठी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही दुपारी ४.३० वाजता निघणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच दहीहंडीच्या वेळेस गोविंदा पथकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.