
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार पटकावणाऱ्या गांजाळे महाराष्ट्रातल्या एकमेव शिक्षिका
पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National teacher award) जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील मृणाल गांजाळे यांच्यासह देशातील ५० शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिका आहेत.
मृणाल गांजाळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पटकावणाऱ्या गांजाळे महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका ठरल्या आहेत. ज्या शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशा शिक्षकांना येत्या राष्ट्रीय शिक्षक दिनी, ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
५० हजार रुपये, प्रमाणपत्रासह रौप्यपदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मृणाल गांजाळे या २०२३-२४ मधील शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या ‘फेलोशिप’च्या मानकरी देखिल ठरल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.