Shivshakti on Moon : भारताचे चंद्रावरील अढळ स्थान 'शिवशक्ती'!

विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचं पंतप्रधानांनी केलं नामकरण


बंगळुरु : भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम फत्ते केली. संपूर्ण जगाने याची दखल घेत भारताचे अभिनंदन केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South pole of Moon) उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडर (Vikram Lander) ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला यापुढे 'शिवशक्ती' (Shivshakti) या नावाने ओळखलं जाणार आहे. यानिमित्ताने भारताने चंद्रावर आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी (BRICS) दक्षिण आफ्रिका व ग्रीसच्या दौर्‍यावर होते. भारतात दाखल होताच पंतप्रधान बंगळुरु येथील इस्रोच्या (ISRO)मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले. यावेळी भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा केली आहे.


तसेच चांद्रयान-२ ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा (Tiranga) हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली. 'हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते.' असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. याचबरोवर शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन करत त्यांनी अनेक गौरवोद्गार काढले.



जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो


पंतप्रधान मोदी म्हणाले, जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. २३ ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरतोय. टच डाउनची खात्री झाल्यावर इस्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला.



तुम्ही रोल मॉडेल आहात


पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना म्हणाले, तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल आहात. तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हे सिद्ध झाले आहे की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करून दाखवता. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत.



भारताची गणना आता पहिल्या रांगेत


एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसर्‍या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे, असं कौतुक पंतप्रधानांनी केलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच