
परिस्थिती गंभीर! मराठवाड्यात २८ टक्के तर कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस
मुंबई : राज्यात यावर्षी अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस झाल्याने पावसाबद्दल (Rain Updates) चिंता वाढवणारी बातमी आहे. फक्त ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सरासरीच्या उणे ५८ टक्के तूट निर्माण झाली आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. मराठवाड्यात सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. मात्र दिलासादायक म्हणजे, आता हवामान विभागाने ८ ते २१ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरीइतका किंवा त्याहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?
औरंगाबाद : उणे ३१ टक्के तूट
बीड : उणे ३० टक्के तूट
हिंगोली : उणे ३२ टक्के तूट
जालना : उणे ४६ टक्के तूट
धाराशिव : उणे २० टक्के तूट
परभणी : उणे २२ टक्के तूट
विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?
अकोला : उणे २८ टक्के तूट
अमरावती : उणे ३१ टक्के तूट
बुलढाणा : उणे २० टक्के तूट
उत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?
धुळे : उणे २१ टक्के तूट
नंदुरबार : उणे २० टक्के तूट
पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?
अहमदनगर : उणे ३२ टक्के तूट
सांगली : उणे ४४ टक्के तूट
सातारा : उणे ३६ टक्के तूट
सोलापूर : उणे २५ टक्के तूट