मराठवाडा : पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर गेल्या महिन्याभरात मात्र पाऊस दडी मारुन बसला आहे. राज्यभरात पावसाच्या गैरहजेरीमुळे शेतकर्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस (Rain) झाल्याने किमान पेरण्या झाल्या. मात्र, आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे.
मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांत पीक सुकून चालले आहे. पावसाअभावी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी घेऊन पीकांच्या मुळांशी पाणी घालत आहेत. बळीराजाने प्रेमाने लावलेली त्याची रोपे सुकताना पाहून त्याचा जीव तीळतीळ तुटतोय पण पावसाने पाठ फिरवल्याने आता बळीराजाचं अख्खं कुटुंबच बादली, तांब्या हातात घेऊन रोजच्या वापरासाठीचं पाणी आपल्या बाळांना जगवण्यासाठी वापरत आहे. असंच चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावातही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे बळीराजा चिंतीत झाला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी २० दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने पिकांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते. परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहीरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…