मीरा रोडमध्ये पत्नीने केली पतीची निघृण हत्या

भाईंदर: मीरा रोडच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीची खलबत्ताच्या दगडाने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.


मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मधील ए -९ या आनंद सरिता सोसायटीत राहणारे आणि मुंबईच्या कपडा बाजार येथे काम करत असलेले रमेशकुमार गुप्ता त्यांची पत्नी राजकुमारी गुप्ता आणि त्यांचा मुलगा जतिन गुप्ता असे तीन जणांचे कुटुंब राहत होते.

गुरुवारी संध्याकाळी राजकुमारी (५५) हिने आपले पती रमेशकुमार (६९) यांच्या डोक्यात घरातील खलबत्ताच्या दगडाने प्रहार करून खून केला. काही दिवसांपासुन राजकुमारी यांचे मानसिक संतुलन बिघडले होते अशी माहिती मिळाली आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे घटनास्थळी पोहचले असुन पाहणी तसेच अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: