मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Dev) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या.
सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांच्याशी १९६२ मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) यांनी लग्न केले होते. या दोघांनीही अनेक चित्रपटांत सोबत काम केले. गेल्यावर्षी २ फेब्रुवारी २०२२ रोजी गुणी अभिनेते अशी ओळख असलेले रमेश देव यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चर्चिली गेली.
१९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. सीमा देव यांनी १९६० मध्ये जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटात रमेश देव यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या जोडीमुळे ‘जगाच्या पाठीवर’ हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यावेळी हा चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’ ठरला होता. त्यांच्या ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या.
त्यांचा मुलगा अजिंक्य देवही प्रसिध्द अभिनेता आहे.
‘सरस्वतीचंद्र’ (१९६८), ‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ (१९७७) या हिंदी चित्रपटांमध्येही सीमा देव यांनी काम केले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…