मुंबई : भाजपविरोधात (BJP) विरोधी पक्षांनी (Opposition Parties) एकत्र येत आघाडी स्थापन केली तेव्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही आघाडी म्हणजे ‘वॅगनर ग्रुप’ (Wagner group) असल्याचे म्हटले होते. मात्र कालच मिळालेल्या वृत्तानुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालं. याच गोष्टीचा आधार घेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, असा टोला त्यांनी यावेळेस लगावला.
नितेश राणे म्हणाले, आपल्याला आठवत असेल वॅगनर ग्रुपबद्दल तेव्हा संजय राऊतने फार बोंबोबोंब केली, अग्रलेख लिहिला की भारतातला विरोधी पक्ष हा वॅगनर ग्रुप आहे. पण काल मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालेलं आहे, मग आता हे सगळे विरोधी पक्ष ज्या एका विमानात बसले आहेत त्यांचं विमान देखील २०२४ ला क्रॅश होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कितीही बैठका घ्या आणि कितीही त्या ग्रुपला ‘I.N.D.I.A’ म्हणा, जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, हे मी विश्वासाने सांगू शकतो, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबईत होणार्या बैठकींबद्दल हा ‘खिचडीचोर’ मोठ्या बाता करतो की पत्रकार परिषद होणार, मोठमोठे नेते येणार. मग त्या मुंबईच्या बैठकीत तू आणि तुझ्या मालकाच्या मुलाने कामगारांची जी खिचडी चोरलेली आहे ती विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना खायला घाला. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आमच्या वतीने या बैठकीसाठी खिचडीचे पॅकेट पाठवू. जेणेकरुन सगळे एकत्र बसा आणि खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा आणि जे वॅगनर ग्रुपचं झालं तेच आपलं होणार यावर डोकं पकडून रडत बसा, अशा खोचक शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.
कोण आहेत हे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विचारणाऱ्या संजय राजाराम राऊत सारख्या खिचडी चोर, पत्रा चाळीतील मराठी लोकांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार करणार्या संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाराष्ट्रासाठी, भाजपा साठी काय योगदान आहे याची ओळख असू शकत नाही, असंही नितेश राणे म्हणाले.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…