यवतमाळ : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पक्ष चालविण्याची क्षमता नाही. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी ते काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील ते थांबवू शकणार नाही. ही क्षमता ठाकरेंकडे नाही. (Maharashtra Politics) पक्ष चालविण्यासाठी २४ तासांतले अठरा तास काम करावे लागते. बाळासाहेबांनी खूप मेहनतीने वाढवलेल्या पक्षाची उद्धवनी पार वाट लावली. २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार-पाचच लोक दिसतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
या पत्रकार परिषदेमध्ये बावनकुळे म्हणाले, राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मी प्रवास सुरू केला आहे. आज यवतमाळ, उद्या अमरावती, परवा भंडारा जिल्ह्यात प्रवास करणार. सप्टेंबरच्या १५ तारखेपर्यंत हा प्रवास सुरू असेल. लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख परिवारांना मोदी सरकारच्या नववर्षाच्या कार्यकाळाचा रिपोर्ट कार्ड आम्ही देत आहोत.
आम्ही त्यांच्यासारखे घरात बसून फेसबूकवरुन सल्ले देत नाही. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात ६०० सक्रिय पदाधिकारी पुढचे दोन महिने प्रवास करणार आहेत. मी स्वतः ‘घर चलो अभियान’ करतो आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील तीस हजार कार्यकर्ते ४८ लोकसभा क्षेत्रात तीन तास १३ महिने प्रवासाला निघतील. मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. आम्ही लोकांना कामाचे पत्र देतो तेव्हा मतदार आम्ही मोदींनाच मत देऊ हे ठासून सांगतो, याचा आम्हाला अभिमान आहे. मोदींच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याचा टार्गेट पूर्ण होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. घरात बसूनच पक्ष गेला. उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्यांचा दरारा आणि त्यांचे काम, याचा आम्ही तीस वर्षाचे साक्षी आहोत. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ती कुवतच त्यांच्यात नसल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कायद्याचे तज्ञ आहेत. याबाबतीत ते योग्य निर्णय घेतील. तर वेगवेगळ्या भागात बैठक झाल्यावर स्थानिक प्रशासन कामाला लागते. त्याचा त्या विभागाला फायदा होतो. विभागाच्या अजेंड्याला बैठकीचा फायदा होतो. शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे? हे सांगण्याची गरज नाही. ओबीसींना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकार मध्येच न्याय मिळाला. केंद्राची विश्वकर्मा योजना येत आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी ओबीसी मंत्रालय का सुचविला नाही? शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीबाबत मी या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शेतकऱ्यांकडून वसुली करू नये शेतकरी अडचणीत आहेत. ज्यांनी बँकेत गैरव्यवहार केला त्यांच्याकडून तो पैसा वसूल करावा अशी मागणी करणार आहे, असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…