Board Exams : बोर्डाची वर्षातून दोनदा परीक्षा; नवा पॅटर्न सोपा की कठीण?

  168

नवी दिल्ली : दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षांना (Board Exams) शालेय व महाविद्यालयीन स्तरावर फार महत्त्व दिलं जातं. यात मिळालेल्या गुणांवर पुढील शैक्षणिक जीवन अवलंबून असतं. या बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना दोघांमधील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी उपलब्ध असणार आहे. यानुसार आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे अकरावी आणि बारावीला विद्यार्थ्यांना कला, विज्ञान व वाणिज्य असं शाखानिहाय नव्हे तर त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असणाऱ्या या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषयाची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देता येणार आहे. निकालानंतर ज्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम गुण मिळाले असतील अशा गुणांचा विचार अंतिम निकालासाठी केला जाणार आहे.


अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या दोन्ही भाषांपैकी एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे. आताच्या बोर्डाच्या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भार कमी व्हावा यासाठी हा नवा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शिक्षणाच्या या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मूल्यांकन करता येईल. त्यामुळे परीक्षा पद्धत आणखी सोपी झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.