Sun pharmaceutical : ‘सनफार्मा’ दीर्घमुदतीसाठी उत्तम…

Share
  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर दीर्घमुदतीसाठी घेऊन ठेवले तर गुंतवणूकदारांना ते नेहमीच चांगला फायदा करून देत असतात. यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालीसीसनुसार चांगल्या कंपन्या निवडून टप्प्याटप्प्याने सातत्याने ते शेअर्स खरेदी करत राहणे हे अत्यंत आवश्यक असते. ‘सन फार्मा’ ही आज आघाडीची औषधी निर्माण करणारी कंपनी असून १९८३ला या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला या कंपनीने मानसिक आजारावर काम करणाऱ्या केवळ ५ औषधांची निर्मिती करून कंपनीला सुरुवात केली. आज प्रामुख्याने हृदयाचे आजार, डोळ्यांचे आजार, हाडाचे आजार, किडनीचे आजार, मानसिक आजार यावरील औषध निर्मितीचे काम ही कंपनी करते. आज जवळपास २००० पेक्षा अधिक उत्पादने या कंपनीची असून या एकूण उत्पादनांपैकी ७०% पेक्षा जास्त विक्री ही बाहेरील देशांमध्ये होते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% उत्पन्न हे अमेरिकेतून येते.

१९९४ साली आयपीओद्वारे ह्या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश झाला. भारतामध्ये आज पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या कंपनीने १९९७ मध्ये अमेरिकेतील ‘कँराको’ ही कंपनी ताब्यात घेतली. ‘सन फार्मा’ या कंपनीने ताब्यात घेतलेली ही त्यांची पहिलीच ‘आंतरराष्ट्रीय कंपनी’ होती. त्यानंतर मधल्या काही वर्षात मिल्मेट लँब, गुजरात लायका या कंपन्याचा ताबा त्यांनी घेतला. २०१० ते २०१२ च्या दरम्यान ‘सन फार्मा’ने दुसा फार्मा, तरो फार्मा आणि युआरएल फार्मा या मोठ्या कंपन्यांचा ताबा घेतला. २०१४ हे वर्ष या कंपनीसाठी अतिशय सोनेरी ठरले. याच वर्षी सन फार्माने औषधी क्षेत्रातील मोठी समजली जाणारी कंपनी ‘रॅनबॅक्सी’ हिचा ताबा घेतल्याची घोषणा केली आणि केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेमध्ये देखील या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये जगातील पहिल्या पाच क्रमाकांमध्ये ‘सन फार्मा’ जाऊन बसली.

आज औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये ‘सन फार्मा’ जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. जवळपास ५००० पेक्षा अधिक लोक या कंपनीत काम करतात. जगभरातील ६ खंडात या कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत. मागील वर्षी ‘वेजमन’ या संस्थेच्या सहकार्याने मेंदूच्या आजारावर उपचार व संशोधनात या कंपनीने प्रवेश केला आहे. ‘सन फार्मा’ या कंपनीची आणखी काही उत्पादने ही यू.एस च्या अन्न व औषधी प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपण यापूर्वीही माझ्या लेखमालेतून ७७० रुपये आणि ५५० रुपये किंमतीला असताना सनफार्मा दीर्घमुदतीसाठी उत्तम म्हणून सांगितलेला आहे. आज या शेअरची किंमत ११३४ रुपये आहे.

सध्या फंडामेंटल अॅनालीसीसनुसार जरी भारतीय निर्देशांक महाग असले तरी शेअर बाजारात आगामी काळातील प्रत्येक घसरणीत ‘सन फार्मा’ चे शेअर्स प्रत्येक टप्प्याला खरेदी करीत गेल्यास आज केवळ ११३४ रुपये किंमतीला मिळणारा हा शेअर पुढील ५ वर्षांचा विचार करता गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देवू शकेल. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होत असते. त्यावेळी निर्देशांका सोबतच घसरणारे शेअर्सचे भाव बघून आपल्याला भीती वाटायला लागते. आपण अशा घसरणीमध्ये घाबरून जावून आपल्याकडील चांगल्या कंपन्यांचे दीर्घ मुदतीसाठी घेतलेले शेअर्स देखील मिळेल त्या किंमतीला विकून टाकत असतो.

त्यामुळे उत्तम आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शेअर्स मध्ये देखील आपण नियोजन आणि अभ्यासाच्या अभावामुळे काही कारण नसताना नुकसान सहन करतो.

दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते. टेक्नीकल अँनालीसीस नुसार शेअर बाजाराची दिशा ही तेजीची गती अजूनही मंदीची असून जोपर्यंत निफ्टी १९६५० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत निर्देशांकात मोठी वाढ होणार नाही. टेक्नीकल अॅनालीसीसनुसार जरी निर्देशांकाची दिशा तेजीची असली काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्याचा विचार करता जर निफ्टी ८५४० या महत्वाच्या पातळीच्या खाली आला तर मात्र निर्देशांकात घसरण होवू शकते.

टेक्निकल अँनालीसीसनुसार एल आय सि, हँवल्स, जेबी फार्मा हे शेअर्स आगामी काळासाठी तेजीची दिशा दर्शवित आहेत. ‘सुंदरम होल्डिंग फायनान्स लिमिटेड’ या शेअरने १०७ ही अत्यंत महत्वाची पातळी ओलांडत टेक्निकल अॅनालीसीसनुसार सक्षम तेजीची दिशा दर्शविलेली आहे. आज १२२ रुपये किंमतीला मिळणारा हा शेअर मध्यम मुदतीचा विचार करता आणखी तेजी दाखविणे अपेक्षित आहे. अल्प व मध्यम मुदतीसाठी शेअर्स खरेदी करीत असताना नेहमी योग्य स्टॉपलॉस लावूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

दीर्घमुदतीचा विचार करता तेजी व मंदी ओळखून चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या लाटेत खरेदी करत जाणे हाच शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होण्याचा खरा राजमार्ग आहे.

( सुचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

(samrajyainvestments@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

6 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

6 hours ago

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…

7 hours ago

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

10 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

10 hours ago

Hathras stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत १२२ लोकांचा मृत्यू

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…

10 hours ago