आपल्याकडे दररोज वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध होत असतात. त्यांचा फारसा काही उपयोग नसतो. तरीही ते एकूणच विषयाची दिशा स्पष्ट करत असतात. असाच एक ताजा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की, भारतातील ७६ टक्के लोकांना मानसिक ताणाखाली काम करावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादकतेवर होतो. या ७६ टक्के लोकांनी मानसिक ताणाची तक्रार केली आहे. ४९ टक्के लोकांनी या ताणाचा नकारात्मक परिणाम होत असल्याची तक्रार केली आहे. एडीपी रिसर्च संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. कामाचे वातावरण आणि त्याबाबतीत कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे, याबाबत त्यांच्या अपेक्षा याविषयी अहवाल खूप काही सांगतो.
भारतातच नव्हे तर जगातच ६५ टक्के लोक कामाच्या ठिकाणी असलेल्या ताणाचा उल्लेख करतात. हे प्रमाण जागतिक पातळीवरचे आहे. आपल्या मानसिक अवस्थेबाबत ४७ टक्के जागतिक पातळीवर लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षी ५३ टक्के इतके होते. म्हणजे टक्क्यांची ही वाढ आहे. म्हणजे तितका ताण वाढला आहे. ही पहाणी १७ देशांतील ३२ हजार कामगारांची केली आहे. असंख्य मालकांनी कोरोना महामारीच्या काळात मानसिक आरोग्य आणि ताणाबाबत प्रचंड समर्थन कर्मचार्यांप्रति दाखवले. पण त्यांच्यासाठी पुढे तो चालू ठेवणे महत्त्वाचे होते. पण तसे घडू शकले नाही. सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण हे मालक आणि कर्मचारी या दोघांसाठीही मूल्यवान असते. ही संस्कृती रूजणे आवश्यक आहे. जेव्हा कर्मचाऱ्यांना आपल्याला समर्थन आहे आणि आपली मानसिक काळजी घेतली जात आहे, असे वाटत असते तेव्हा ते अर्थातच चांगले काम करतात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे काम आपली भूमिका पार पाडण्यात चांगले होते आणि ते कमी प्रमाणात आजारी रजा घेतात. कंपनीकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक होतो.
याबाबत एक विषय जरा विषयांतर वाटेल तरीही त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. जेव्हा मानसिक ताणाबरोबरच इतरही काही महत्त्वाचे घटक कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम करत असतात. हरियाणातील नूह या शहरात जातीय हिंसाचार झाला. हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर हल्ले झाले. आता हरियाणातील पण दिल्लीपासून जवळ असलेल्या गुरूग्राम या सर्वात मोठ्या उद्योग शहरात काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत. त्यांना परत आणण्यासाठी मनधरणी करावी लागत आहे. गुरूग्राम हे देशातील अत्यंत मोठे कमर्शियल आणि औद्योगिक हब आहे. पण तेथे जगातील सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. तेथे आता कामगार नाहीत. जातीय हिंसाचारामुळे त्यांच्या मानसिक धैर्यावर परिणाम झालेला आहे. जे कर्मचारी असे सांगतात की त्यांना आपल्या मालकाचे समर्थन आहे, त्यांचे प्रमाण या वर्षी ७० टक्क्यांवरून ६४ टक्क्यांवर आले आहे. ही सारी आकडेवारी जागतिक स्तरावरील आहे. अनेक ठिकाणी मालक, कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी जे उपाय आहेत, त्यांचे सुसूत्रीकरण किंवा फॉर्मलायझिंग करत आहेत. ते कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकते. भारतातील ७१ टक्के कर्मचारी सांगतात की, ते इतर सहकारी किंवा मालकांशी मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोलू शकतात. पण ५६ टक्के लोकांना असे वाटते की, त्यांच्या सहकाऱ्यांकडे किंवा व्यवस्थापकांकडे ते कौशल्य नाही. भारतात जेव्हा कोरोनाची लाट आली होती तेव्हा कित्येक कामगार आपल्या मूळ गावी निघून गेले. कारण शहरात त्यांच्यासाठी नोकऱ्याच नव्हत्या. पण अजूनही कित्येक कामगार पुन्हा कामावर परतलेले नाहीत. परिणामी संभाजी नगरसारख्या शहरात अनेक कंपन्यांच्या कार्यालयात कामगार नसल्याने चाके पुन्हा फिरत नाहीत. कित्येक कंपन्या बंदच आहेत आणि त्यासाठी बेरोजगारी हे कारण नाही तर कामगार परतलेले नाहीत, हे कारण आहे. यात बजाज, स्कोडा यासारखी मोठी कंपनीही आहे.
कामगारांना मानसिक ताण तेव्हा इतका आला होता की ते अजूनही पुन्हा शहरात येण्यास तयार नाहीत. त्यातून देशातील आजचे बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य कसे टिकवायचे, हाच मोठा प्रश्न सध्या मालकांसमोर आहे. समुपदेशनाने ही समस्या सुटू शकेल. पण तितका वेळ कर्मचाऱ्यांनीही द्यायला हवा. तसेच तितके समुपदेशक तरी होत आहे का, हाही प्रश्न आहे. हरियाणा, संभाजीनगर, गुरूग्राम यासारख्या कमर्शियल हब्जची ही अवस्था आहे. मग लहान शहरांमध्ये काय अवस्था असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. भारतात दरवर्षी ४० लाख कामगार शक्ती उद्योगांना मिळते. त्यापैकी हॉटेल, पर्यटन आणि उत्पादन क्षेत्र आघाडीवर आहे. याचा अर्थ असा की इतक्या मोठ्या संख्येने भारताला कामगार शक्तीची आवश्यकता आहे. तेवढे मजूर उपलब्ध होत नाहीत आणि तरीही भारतात बेरोजगारी प्रचंड आहे. सर्वाधिक कामगार शक्ती अर्थातच सेवा क्षेत्रातून लागते. त्यानंतर इतर क्षेत्रांचा क्रमांक येतो. ही सीएमआयईची आकडेवारी असल्याने ती अधिकृत आहे. इतक्या कामगारांना आज मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे.
कामगारांना मानसिक ताणाचा सामना करावा लागू नये, यासाठी कित्येक तोडगे आहेत. यात कामगारांचे गट करून त्यांच्यावर प्रयोग करणे, कामगारांचे कामाचे तास बदलणे, त्यांच्या कामात बदल करणे असे कित्येक उपाय आजही कंपन्यांतून केले जातात. समुपदेशन हा तर उपाय आहेच. कित्येक कंपन्या अनेक वैज्ञानिक प्रयोग करून वेगवेगळे निष्कर्ष काढतात. ज्या कामगारांची घरची परिस्थिती अगोदरच तणावाची आहे, त्यांच्यावर या मानसिक ताणाचा जास्त परिणाम होण्याची शक्यता असते. कामगारांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांत कामगारांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम ठेवले जातात. कामगार मानसिक तणावमुक्त राहिले तरच कामगारांची संपूर्ण शक्ती कामासाठी लागून कामाची उत्पादकता वाढते. त्याचा संबंध पुढे कंपनीच्या उत्पादनाशी येऊन कंपनीचा आर्थिक ताळेबंद सुधारतो. त्यामुळे कामगारांना मानसिक ताणाखाली काम करावे लागणे, हे काही सुचिन्ह नाही. या प्रकारच्या ताणामुळे विविध कामगार आज आजारी पडण्याचे प्रकारही समोर येत आहेत. अनेक कामगारांना तरुण वयातच वेगवेगळे आजार होताना दिसत आहेत. त्यामुळे कामगारांनीही मानसिक ताण न घेता कामाला सामोरे जावे, त्यासाठी त्यांनी समुपदेशन चुकवू नये. अंतिमतः ते त्यांच्याच भल्यासाठी आहे. व्यवस्थापन क्षेत्रात कामाच्या ठिकाणी योग्य कामाचे वातावरण यासाठी चांगला प्रकाश, व्हेंटिलेशन, कुलिंग व्यवस्था, बसण्याची चांगली आसन व्यवस्था आणि खाण्या-पिण्याच्या सोयी वगैरे दिलेल्या असतात. पण काही कंपन्या या प्राथमिक सोयीही पुरवत नाहीत. तेथे अर्थातच कामगारांची उत्पादकता कमी असते. मालक या सोयी उपलब्ध करून देऊ शकला तरच तो चांगल्या कामाची अपेक्षा करू शकतो.
umesh.wodehouse@gmail.com
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…