Sayaji Shinde : वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनासाठी सुचवला एक नवा उपक्रम

मंत्रालयात जाऊन अजितदादांची घेतली भेट


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे त्यांच्या वृक्षप्रेमामुळे सर्वांना सुपरिचित आहेत. सह्याद्री येथील देवराई त्यांनी मोठ्या कष्टाने फुलवली आहे. मात्र राज्याच्या वनविभागाकडे (Forest Department) असलेल्या हजारो हेक्टर जमिनावर वृक्षसंवर्धन (Tree Conservation) होत नसल्याच्या बाबीवरुन ते नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राज्य वनविभागाच्या जमिनीवर केवळ वृक्षसंवर्धनाचे बोर्ड लावले जातात मात्र जागा रिकामी पडून आहे, अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. पण याचवेळी याकरता एक उपक्रमदेखील सुचवला.


सयाजी शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्याशी बोलताना एक नवीन संकल्पना मांडली. 'वृक्ष प्रसाद योजना' असं या उपक्रमाचं नाव आहे. आपण सिद्धीविनायक, महालक्ष्मी दर्शनाला जातो. त्यावेळी अभिषेक करतो. तेव्हा जे झाड देवाला आवडतं ते भेट देण्यात येईल आणि त्याचं संवर्धन होईल. त्यामुळे हा उपक्रम सुरु करण्याची मागणी केल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं.



सयाजी शिंदे यांची नाराजी


माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत आम्हाला कसलाही फायदा नको आहे. बायोडायव्हर्सिटीचे (Biodiversity) केवळ बोर्ड लागलेले आहेत. त्यात आम्हांला पडायचं नाही आहे. परंतु आम्ही जे करतो त्याला मदतीची गरज आहे. वनविभाग, महसूल विभागाची मदत मिळते आहे, परंतु काही अधिकारी या टेबलावरुन त्या टेबलावर करतात, त्यामुळे वेळ वाया जातो. त्यांचंही सहकार्य मिळावं, यासाठी अजित पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आज अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचीही भेट होणार होती. परंतु ते जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता