Black marketing of Rice : तांदळाचा काळाबाजार! वर्धा जिल्ह्यातील ८८ हजार किलो तांदूळ जप्त

साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले


वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील पुलगाव येथे तांदळाच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८८ हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या गोदामामध्ये अनेक दिवसांपासून तांदळाचा काळाबाजार (Black marketing of Rice) सुरु असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार छापा टाकत हा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.


विशेष बाब म्हणजे वर्ध्यातील शासकीय तांदूळ छत्तीसगडला रवाना होत होता. स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ खरेदी करुन तो छत्तीसगडच्या राईस मिलमध्ये पाठवला जायचा, ही बाब तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी तांदळाची वाहतूक करणार्‍या तीन ट्रकचालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.


वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील महेश शामलाल अग्रवाल या व्यापार्‍याचं हे गोदाम होतं. वर्धा पोलिसांच्या कारवाईनंतर शासकीय तांदळाचा काळाबाजार करणार्‍या साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे

आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय