छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) जवळजवळ १३ महिन्यांपूर्वी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्ष अधिकाधिक बळकट होत चालला आहे. ठाकरे गटातील (Thackeray Gat) बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश सुरुच आहे. ठाकरे गटाला पडलेल्या या भगदाडामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) चिंतेत भर पडत चालली आहे.
गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. शिव चित्रपट सेनेतही मराठीतील दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. तर युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष अधिकाधिक मजबूत होत चालला आहे.
दरम्यान, आता ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणच्या माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या नव्या साथीदारांचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केलं.
एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उबाठा गटाचे माजी महापौर गजानन बारवाल, माजी शाखाप्रमुख सतीश माहोरे, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल, गुड्डू बन्सीवाल यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. हा ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का असून भविष्यात ठाकरे गटाला आणखी काय काय धक्के सहन करावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…