मुंबई: कल्याणमध्ये (kalyan) एका तरूणाने अल्पवयीन मुलीची (minor girl) भर रस्त्यात चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या जीवघेण्या हल्ल्यात त्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही मुलगी ११ वर्षांची होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आदित्य कांबळे(वय २५) याला अटक केली आहे.
कल्याणच्या तिसगावमध्ये ही घटना घडली. ही अल्पवयीन मुलगी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसह घरी जात होती. याच वेळीस सोसायटीच्या परिसरातच या तरूणाने या अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्याचवेळेस तेथील परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहिली आणि तातडीने तिथे धाव घेत या तरूणाला अडवले.
मात्र त्याआधी या तरूणाने मुलीवर जोरदार वार केले होते. पोलिसांनी या आरोपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरीकडे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिचा वाटेतच मृत्यू झाला. आईसमोर या मुलीवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या तरूणाने अल्पवयीन मुलीवर का हल्ला केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…