Devendra Fadnavis : ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त टोला


शिर्डी : आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळेस २०१९ साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले. तसंच, आमचं सरकार 'फेसबुक सरकार' नव्हे तर 'फेस टू फेस सरकार' आहे, असा जबरदस्त टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. तर वर्षाचे ३६५ दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. कारण हे बंद दाराआड काम करणारं सरकार नाही तर हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढेही पोहोचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेकांपर्यंत पोहोचत आहेत, असंही पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन, त्याची अजून देखील दहशत आहे. २०१९ साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो.



हो आहे आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, पण...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला असून दोघांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका केली जाते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी आमचे लक्ष तिथे आहे, असं फडणवीस म्हणाले.



सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही


राज्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे. परंतु आपल्याला मराठवाडा, नगर या भागातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी संपवायचा आहे. त्यासाठी वाहून जाणारं पाणी इकडे वळविण्यासाठी लवकरच काम सुरू करतोय. आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतोय. नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पीक विमा योजना यांसारख्या अनेक योजना आणल्या आहेत. विकासकामांना पैसा कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. दुष्काळाची परिस्थिती येऊ नये, अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. पण दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असंही फडणवीस पुढे म्हणाले आहेत.



नगर जिल्हा पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा करण्याचे प्रयत्न


आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र नगर जिल्हा या त्रासापासून मुक्त होणार आहे. नगर जिल्हा कदाचित पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा होईल या पद्धतीने वेगाने काम सुरु होणार आहे आणि हे काम निश्चित वेळेत पूर्ण होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Kolhapur Accident News: इनोव्हा-लॉरीची जोरदार धडक: दोघांचा जागीच मृत्यू DYSP वैष्णवी पाटील गंभीर...

कोल्हापूर : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) म्हणून कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या खासगी

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरात रविवारी मध्यरा‍त्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ

साताऱ्यात आनंदावर शोकाची छाया; लेकीच्या जन्मावेळीच सैनिक पित्याचा अपघाती मृत्यू

सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे.

CSMT स्टेशनवर विमानतळासारखी सुरक्षा; वाढत्या धमक्यांनंतर कडक निर्बंध,आता प्रवेश सहज नाही…

मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) मेल आणि एक्सप्रेस प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी अनिवार्य

कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद