मालेगाव : या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी टिका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपल्या व्याख्यानात केली.
एक तर तू गांधी नाही आणि सावरकर तर नाहीच नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून ते तर खान आहेत… महात्मा गांधीचे (Mahatma Gandhi) वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला. फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचे सांगत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव ‘खान’ असल्याची टिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली.
भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टिका केली.
देशभरात काल देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव शहरात देखील तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले.
मालेगाव येथील भारतीय विचार विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर विचारांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे आयोजन सटाणा नाका भागातील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. या व्याख्यानास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…