मुंबई: पुण्यात (pune) अंगाचा थरकाप उडवणारी अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात दहा ते बारा जणांच्या टोळीने एका तरूणाची बेदरकारपणे हत्या (murder) केल्याची भयानक घटना घडली आहे. ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडली. आठ ते दहा जणांच्या टोळीने तलवारी, लोखंडी हत्यार तसेच दगडाने मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. पुण्यातील मंगला टॉकीजसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी ९ जणांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन म्हस्के असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले. दरम्यान, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आरोपी सागर कोळनट्टी उर्फ यल्ला, पंडित कांबळे, मलिक कोळ्या उर्फ तुंड्या, इम्रान शेख तसेच आणखी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन म्हस्के मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्रीचा ‘गदर २’ या सिनेमाचा शो पाहून तो आपल्या घरी परतत होता. मात्र त्याचवेळी आरोपी त्याला मारण्यासाठी दबा धरून बसले होते. तो थिएटरमध्ये सिनेमा पाहून परतत असताना या आरोपींच्या टोळीने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याला हत्यांरांनी प्रचंड मारहाण केली.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…