Monday, March 24, 2025
Homeक्रीडाAsian Games: आशियाई स्पर्धेआधी भारताला मोठा झटका, विनेश फोगाट बाहेर

Asian Games: आशियाई स्पर्धेआधी भारताला मोठा झटका, विनेश फोगाट बाहेर

मुंबई: आशियाई गेम्सआधी भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट दुखापतग्रस्त झाली आहे आणि याच कारणामुळे ती आशियाई गेम्समधून बाहेर झाली आहे. ही माहिती खुद्द विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली. विनेश फोगाटला आशियाई स्पर्धेत डायरेक्ट एंट्री मिळाली होती.

विनेशने मंगळवारी याची घोषणा केली की ती गुडघ्याच्या दुखापतीमुळे चीनमधील हाँगझोऊमध्ये होणाऱ्या आशियाई गेम्समध्ये भाग घेणार नाही. विनेश आणि बजरंग पुनिया यांना आशियाई स्पर्धेच्या ट्रायल्समध्ये सूट देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता.

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली ही माहिती

विनेशने पोस्टमध्ये लिहिले, मला एक वाईट बातमी सांगायची आहे. दोन दिवसआधी १३ ऑगस्ट २०२३ला सरावादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी या गुडघ्याचे ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. विनेशने पुढे सांगितले, माझे १७ ऑगस्टला मुंबईत ऑपरेशन आहे. मी २०१८मध्ये भारतासाठी आशियाई खेळांमध्ये जे सुवर्णपदक जिंकले होते तेच स्वप्न मला पुन्हा एकदा जिंकायचे होते. मात्र दुर्देवाने या दुखापतीमुळे मी या खेळाडू भाग घेऊ शकत नाही.

 

संबंधित अधिकाऱ्यांना दिली माहिती

प्रसिद्ध कुस्तीपटू विनेशने सांगितले की तिने संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून रिझर्व्ह खेळाडू आशियाई स्पर्धेसाठी पाठवले जातील. विनेशने पुढे लिहिले की, माझे सर्व चाहते नेहमी माझ्या पाठिशी असतील अशी मला आशा आहे. ज्यामुळे मी लवकर बरी होऊन पुन्हा मजबूत पुनरागमन करेन.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -