राजभवनाच्या गेटबाहेर गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म; रुग्णवाहिका न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू

लखनऊ : प्रसूती वेदना होत असलेल्या गर्भवती महिलेला वेळेत रुग्णवाहिका (Ambulance) न मिळाल्याने राजभवनाच्या गेटबाहेर रस्त्यावरच बाळाची प्रसूती करावी लागली. गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र योग्य सुविधा अभावामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


लखनऊमधील राजभवनाबाहेर एका महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. तेथील लोकांनी अनेकदा फोन करूनही रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Deputy CM Brajesh Pathak) यांनी याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.





यानिमित्ताने सर्वांसाठी सर्वसमावेशक आरोग्य सुविधांच्या अभावावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.


झोपडपट्टीतील रहिवासी ब्रजेश सोनी टिटू यांची पत्नी रूपा (३०) ही गरोदर होती. रविवारी सकाळी तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला झलकारीबाई रुग्णालयात नेले. येथे त्यांना कोणी तपासले नाही. रात्री ११.४५ च्या सुमारास घरी परतत असताना रुपाला राजभवनाजवळ प्रसूती वेदना होऊ लागल्या. तेथे एका व्यक्तीने रुग्णवाहिका सेवेला फोन केला. मात्र, बराच वेळ तेथे रुग्णवाहिका पोहोचली नाही.


याची माहिती मिळताच चौकी इन्चार्ज भानू प्रताप सिंह, महिला हवालदार मृदुला आणि इतर पोलिसांसह पोहोचले. त्यांच्या आगमनानंतरच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका पोहोचली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तिच्या वहिनी आणि कॉन्स्टेबलसह घेऊन त्यांनी झलकारीबाई हॉस्पिटल गाठले. मात्र हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. पोलिसांनी महिलेला लेबर रूममध्ये नेले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले.


उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असे ब्रजेश पाठक यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद

भारतात चॅट जीपीटीपेक्षा लोकप्रिय झाले इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप

नवी दिल्ली : गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन प्लॅटफॉर्मवर सध्या चॅट जीपीटीपेक्षा इंडियन ऑइल

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

Air India Airlines : युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील एअर इंडियाची ७२ उड्डाणे सुरू; अतिरिक्त सेवांची तयारी

मध्य पूर्वेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्या

एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वाचा बदल, 'या' कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत

नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) पुरवठ्याबाबत एक मोठा आणि

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष