One card system : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी सुखकर; देवेंद्र फडणवीसांनी केली 'ही' सूचना

  108

अजितदादा आणि नितीन गडकरींचेही केले तोंडभरुन कौतुक


पुणे : पुण्यातील चांदनी चौकातील नव्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानिमित्त (Chandani Chowk flyover) आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात बस, मेट्रोला जोडणारे 'वन कार्ड' (One card) सुरु करण्याचे आदेश देऊन पुणेकरांसाठी आणखी एक खुशखबर दिली.


मेट्रो, बससह पुण्याशी जोडणाऱ्या या सर्व ट्रान्सपोर्ट सिस्टिम्सना 'वन कार्ड' योजनेनं जोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. महा मेट्रोचे एमडी श्रावण हार्डिकर यांच्यासह पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला तशा सूचना करण्यात आल्या आहेत. हे वनकार्ड पीएमपीच्या बसला (PMP Buses) देखील लागू होईल, अशा प्रकारचं झालं पाहिजे. म्हणजे आता या वनकार्डवर आपली मेट्रो आणि बस सिस्टिम एकत्रित चालली पाहिजे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.



काय आहे वनकार्ड?


पंतप्रधान मोदींच्या मते वनकार्ड हे केवळ पुणे मेट्रोसाठी नाही तर पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच या कार्डवर देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पुढच्या काळात मुंबईला गेलो तरी पुण्याचं कार्ड दाखवून मुंबईच्या मेट्रोत प्रवास करता येईल, असं हे वनकार्ड आहे.



अजितदादांचे आणि नितीन गडकरींचे कौतुक


पुण्यावर प्रेम करणारा अजित पवार यांच्यासारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळे विकासाला आणखी गती मिळेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. वाहतूक कोंडीत अडकून लोकांना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून या चौकाला चांदणी चौक हे नाव पडले असे मला वाटत होते. पण अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. अजितदादांनी या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडलं ते सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.


नितीन गडकरी (Nitin Gadkari) साहेबांच्या पुण्यावर, राज्यावर असलेल्या प्रेमामुळे वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या वेळा पुण्यात आले तेवढ्या वेळेस दुसरे कोणतेही पंतप्रधान पुण्यात कधी आले नाहीत. ते आणखीही पुण्यात येतील असे फडणवीस म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची