मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात वेगात आलेल्या एर्टिगा कारची वीजेच्या खांबाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये (Car Accident) कारचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. सदर घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
कारमधून प्रवास करणाऱ्या २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना कार खांबापासून वेगळी करण्यासाठी तब्बल १ तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. एर्टिगा कार वेगाने चेंम्बुरकडे जात होती. मात्र, एससीएलआर ब्रीजजवळ पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने एका वीजेच्या खांबाला जोरात धडक दिली. गाडीचा वेग अधिक असल्याने कारचे जागेवरच दोन तुकडे झाले. तुटलेल्या गाडीचा फोटो पाहून अपघाताची भीषणता आणि गाडीचा वेग लक्षात येते.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…