येसिलर्ट : तुर्कस्तानच्या दक्षिण भागात गुरुवारी रात्री ५.२ रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला. भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या प्रांतातील येसिलर्ट शहरात होता.
जपानमधील होक्काइडो येथे देखील ६.० तीव्रतेचा भूकंप झाला, असे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (जीएफझेड) ने सांगितले.
आदियमनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही प्रांत फेब्रुवारीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झाले होते, ज्यामध्ये ५० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. काल रात्री झालेल्या भूकंपामुळे अनेकजण जखमी झाल्याची शक्यता आहे.
भारताच्या पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांवर ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) च्या माहितीनुसार, पहाटे २.५६ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएस नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता.