मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Elections) एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपचे (BJP) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यात अगोदरच शिवसेनेचे (Shivsena) तब्बल ४० आमदार सोबत आले आहेत. आता ‘राष्ट्रवादी’चेही (NCP) आमदार सोबत आल्याने भाजपला अधिक बळ मिळाले आहे. यातूनच भाजप दोन्ही निवडणुकांत आपले यशाचे मिशन फत्ते करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता आणखी एका वृत्तामुळे भाजपला प्रचंड फायदा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये भाजपच्या नेत्यांची चिंतन बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे राज्यात लढविण्यात येणाऱ्या जागांबाबतही चर्चा झाली.
शिवसेनेने ‘कमळ’ चिन्हावर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, पारोळ्याचे चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोरआप्पा पाटील, चोपड्याच्या लताताई सोनवणे आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे पाचही आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याबाबतची सर्व रचना पूर्ण झाली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जळगावच्या पाच मतदारसंघांतून शिवसेनेने ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली तर भाजपचे पाचोरा येथील अमोल शिंदे, पारोळा येथील करण पवार, तर जळगाव ग्रामीणमधील चंद्रशेखर अत्तरदे यांच्या तयारीचे काय? असा प्रश्नही निर्माण होतो. दरम्यान, पारोळा येथील करण पवार म्हणाले की, “पक्षवाढीचे कार्य करण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही कार्य करीत आहोत. आमच्या सोबत कुणी येत असेल आणि पक्ष बळकट होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे.” त्यामुळे भाजपतील इच्छुकांची निवडणुकीत नेमकी भूमिका काय, याकडेही लक्ष असेल.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…