NCP Meeting : लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार भरवणार : सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात पार...


मुंबई : लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली. आज राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.


पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्यव्यापी उभे राहणारे संघटन अशा वेगवेगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुढच्या आठवड्यात बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाच्या कामांची व संघटनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम ठेवणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.


पुढे तटकरे म्हणाले, लोकसभानिहाय राज्याचा दौरा केला जाणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे करण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय राज्यात आमचे ९ मंत्री असून त्यांचा जनता दरबारसुध्दा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पुढच्या आठवड्यात सुरु करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.