Dhule News : आदिवासी दिनानिमित्त लावलेला फलक फाडल्याप्रकरणी धुळ्यात दोन गटांत राडा

आमदार काशीराम पावरांसह पोलिसांच्या सहा गाड्यांची तोडफोड


१८ जण जखमी, तर २०० दंगलखोरांवर गुन्हा दाखल


धुळे : शिरपूर तालुक्यातील चारणपाडा येथे आदिवासी दिनानिमित्त (World Tribal Day) लावलेला फलक फाडल्याच्या कारणावरून दंगल झाली. या दंगलीत १५ पोलिसांसह तीन गावकरी जखमी झाले आहेत. शिवाय दगडफेकीत शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीसह पोलीस प्रशासनाच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने दंगल आणि जीवे ठार करण्याच्या प्रयत्नाच्या कलमांसह सुमारे २०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गावातून पोलीस प्रशासनाने रूट मार्च करून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


चारणपाडा भागातील दंगल रोखण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा बळाचा वापर करीत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे मध्यरात्री नंतर ही दंगल आटोक्यात आली. दरम्यान सकाळ पासून या भागात राज्य राखीव दलाची एक तुकडी तर दंगल प्रतिबंधक करणाऱ्या दोन तुकड्या यांच्यासह मुख्यालयातील राखीव पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.


पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, यांच्यासह अनेक अधिकारी रात्रीपासूनच या भागात तळ ठोकून आहे. तर सकाळपासून या तणावपूर्ण परिसरात पोलिसांनी रूट मार्च करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान दंगलखोराची ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली असून अटक सत्र सुरू झाले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जनतेला शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.



नेमके प्रकरण काय?


शिरपूर तालुक्यातील सांगवी नजीक असलेल्या चारणपाडा येथे आदिवासी दिनानिमित्त फलक लावण्यात आले होते. या फलकाचे नुकसान झाल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी काही तरुण संशयितांकडे गेले. मात्र यावेळी संवाद होण्याऐवजी हाणामारी झाली. त्यामुळे एक गट फलक फाडणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यासाठी बसला. त्यामुळे महामार्गावरील रहदारी ठप्प झाली.


दरम्यान वातावरणातील गंभीरता ओळखून सांगवी आणि शिरपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच शिरपूरचे आमदार काशीराम पावरा हे देखील जमावाची समजूत घालण्यासाठी आले. मात्र जमावांमधून घोषणाबाजी आणखी वाढली. यावेळी पोलिसांची अधिकची कुमक देखील घटनास्थळी पोहोचली. यानंतर जमाव हिंसक झाला. जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तर काही तरुणांनी आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी रस्त्यावर उलटवली. तर पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर देखील दगडफेक करण्यास सुरुवात झाली.


या दगडफेकीत पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आमदार पावरा यांना सुरक्षेसाठी तातडीने एका घरात हलवले. यानंतर मात्र जमावाने दगडफेक आणखीनच वाढवली. परिस्थिती हिंसक झाल्यामुळे जिल्ह्याभरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. या दंगलीची माहिती कळाल्याने जिल्हाभरातील पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना टार्गेट केले गेले. दगडफेकीसाठी जमावाकडून गोफनचा देखील वापर केल्या गेल्याचा संशय व्यक्त होतो आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या