नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर याबाबत बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “यावर्षी आमच्याकडे दोन कसोटी सामने आहेत, एक इंग्लंडविरुद्ध आणि एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मला आशा आहे की या सामन्यांचा महिला क्रिकेटवर मोठा प्रभाव पडेल. मात्र, आताच्या काळात एवढेच सामने पुरेसे नाहीत त्यामुळे कसोटी सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. एका क्रीडा ग्रुपने हरमनप्रीतशी संवाद साधला. त्यावेळी तिने कसोटी क्रिकेटची निकड व्यक्त केली.
भारतीय महिला संघ २०२२-२५ दरम्यान चालणाऱ्या वर्तमान फ्यूचर टूर्स प्रोग्राम चक्रामध्ये सर्वात लांब फॉरमॅटमध्ये स्पर्धा करणाऱ्या चार संघांमध्ये सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा फक्त भारतीय संघ आहे. बाकी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे भारतापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणार आहेत. या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत म्हणाली की, कसोटी क्रिकेट स्वरूपातील अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामने खेळले जायला पाहिजेत. आगामी काळात टीम इंडिया फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचा कसोटी मालिका खेळणार आहे.
हरमनप्रीत म्हणाली की, आम्हाला महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामने परत आणावे लागतील. कारण महिला क्रिकेटसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. २०२३-२४ हंगामात भारताला मायदेशात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. संघाने याआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. सध्याच्या एफटीपीमध्ये इंग्लंड सर्वाधिक पाच कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चार आणि तीन कसोटी खेळणार आहेत.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…