मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत असून, स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या ५६ रुग्णांची नोंद झाली आहे, तर मलेरिया २२६, डेंग्यू १५७, लेप्टोचे ७५ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पावसाळी आजार बळावत असल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
–
जून महिना कोरडा गेल्याने यंदा पावसाळ्यात उद्भविणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत होते. मात्र, संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे ५७९, मलेरियाचे ७२१, लेप्टोचे ३७७, गॅस्ट्रोचे १६४९, कावीळ १३८, स्वाईन फ्ल्यू ८६ आणि चिकनगुनियाचे २४ रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ ऑगस्टमध्येही कायम असून, सर्वच पावसाळी आजारांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात एकूण तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष ५०० बेडही तैनात आहेत. तसेच संध्याकाळी ४ ते ६ वा. पर्यंत ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय, कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबविण्यात येत आहे.
मलेरिया २२६
डेंग्यू १५७
लेप्टो ७५
स्वाईन फ्लू ५६
गॅस्ट्रो २०
चिकनगुनिया – ९
कावीळ ६
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…