Threat call to Mantralaya : थेट मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

मुंबई पोलीस पुन्हा एकदा अलर्ट मोडवर


मुंबई : मुंबईत अतिरेकी हल्ल्यांच्या (Terrorist attacks) धमक्यांचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा कॉल (Threat call) करणार्‍याला अवघ्या दोन तासांतच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विलेपार्ले येथून पकडले. यानंतर आता थेट मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला (Mantralaya Control room) धमकीचा फोन आला असून यामुळे मुंबई पोलीस पुन्हा एकदा अलर्ट मोडवर (Alert mode) आले आहेत.


मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला आलेल्या या फोनद्वारे येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. काल सोमवारी रात्री १० वाजता नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर (Landline) हा धमकीचा फोन आला आहे. अतिरेकी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याचं स्थळ धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलेलं नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.


दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीमध्ये काही तथ्य नसल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता आलेल्या धमकीत तथ्य आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता