Bhalchandra Nemade speech : औरंग्याला मोठं करणार्‍यांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का?

नितेश राणे यांचा खडा सवाल


ठाकरे पिता-पुत्रांचाही घेतला समाचार


मुंबई : ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते आणि कोसला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यामुळे हिंदू मने दुखावली गेली असून अशा लोकांना पुरस्कार द्यायचा का असा थेट सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता मुंबईतील टोलविषयी बोलणार्‍या व गुजराती आणि मारवाडी लोकांवर द्वेष दाखवणार्‍या ठाकरे पिता-पुत्रावरही हल्लाबोल चढवला आहे.


नितेश राणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी औरंग्याला मोठं करण्याच्या आणि इतिहासामध्ये शिवरायांना औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याच्या षडयंत्राला खतपाणी घातले. औरंग्या हिंदूद्वेष्टा नव्हता, असं भालचंद्र नेमाडे एका कार्यक्रमात म्हणाले. ज्याने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू महिलांवर, समाजावर अत्याचार केला, धर्मांतरं घडवून आणली अशा औरंग्याला मोठं करण्याचं जे काम महाराष्ट्रात चाललं आहे, त्याला खतपाणी घालण्याचं काम भालचंद्र नेमाडेंसारख्या लोकांकडून होत आहे. अशा लोकांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का? आणि दिलेले पुरस्कार सरकारने परत घेतले पाहिजेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.



सगळे कॉन्ट्रॅक्ट हायवे कन्स्ट्रक्शनलाच का?


संजय राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेत असे किंवा सामनामध्ये असो, केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना महाराष्ट्र किती कळतो यावर आपले अकलेचे तारे चमकवलेले आहेत. तेव्हा जशी ब्रिटीशांची ईस्ट इंडिया कंपनी होती तशी या ठाकरेंची हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का? कारण कोविडचा काळ असो किंवा महापालिकेच्या यांच्या सत्तेचा काळ असो, सगळे कॉन्ट्रॅक्ट फक्त हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात यायचे. पण मग वैभव चेम्बर्समध्ये बसून कोण कोण किती किती गुजराती आणि मारवाडी व्यापार्‍यांना भेटायचा याची माहिती आम्ही महाराष्ट्राला देऊ का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.



पुन्हा वसुली चालू करायचा हा धंदा


आज गुजराती आणि मारवाडी लोकांवर जो द्वेष दाखवला जातोय, मातोश्री २ हे कुठल्या गुजराती आणि मारवाडींच्या पैशांवर तयार झालंय याची थोडी माहिती द्यावी. कालपासून जो पेंग्विन तडफडतोय, काल त्याने पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील टोल बंद करावेत असं म्हटलं. मातोश्रीतील टोल बंद झाल्यामुळे आता या लोकांना मुंबईतील टोल आठवले आहेत. सगळं खर्चपाणी बंद झाल्याने अप्रत्यक्ष पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरांना यानिमित्ताने भडकवायचं आणि परत हप्ते चालू करायचे, वसुली चालू करायची हा त्यांचा धंदा आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत