Pravin Darekar : भगवा तुम्हाला सांभाळता आला नाही यात दोष कोणाचा?

प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला


मुंबई : उबाठा गटाच्या वतीने काल संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) आयोजित केलेल्या एका मेळाव्यात उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते तसेच देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली. या टीकेला भाजपचे नेते चोख प्रत्युत्तर देत आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. तर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.


प्रवीण दरेकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंना संभाजी ब्रिगेडचा आसरा घ्यावा लागतो आहे, कारण आपल्या सभांना शिवसैनिक येतील का हा प्रश्न त्यांना पडला असेल. ठाकरेंनी कायम मराठा नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मग नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकांना त्यांनी बाजूला केले.


कालच्या उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यांना उत्तर देतांना दरेकर म्हणाले की, भगवा तुम्हाला सांभाळता आला नाही यात दोष कोणाचा? आम्ही देशविरोधींची थडगी उद्ध्वस्त केली आणि तुम्ही याकूब मेमनच्या थडग्याचं उद्दतीकरण करत बसलात. त्यामुळे आपल्याला हिंदुत्वाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आपली हिंदुत्वाची व्याख्या काँग्रेसला मान्य आहे का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.


पुढे ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंचा उल्लेख आशिष शेलार यांनी घरबशा केला. मात्र तो आता बदलून घरकोंबडा करावा लागेल कारण ते घरातून आरवतात'. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मस्टर मंत्री म्हटल्यामुळे दरेकर म्हणाले, 'ते देवेंद्रजींवर टीका करतात कारण त्यांनी ठाकरेंच्या नाकाखालून सरकार नेलं. त्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली टीका हा बालिशपणा आहे', असा दरेकरांनी हल्ला चढवला.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.