नवी दिल्ली : इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले आहे की, “५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान-३ Chandrayaan3 या अंतराळयानाने पाहिलेला चंद्र.”
चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. चंद्राच्या अगदी जवळ ते पोहोचले असून २३ ऑगस्टला उतरण्याची जय्यत तयारी झाली आहे.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, तेव्हा चांद्रयानाने अवकाशातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये अप्रतिम दृश्य दिसले. चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत केलेला प्रवेश आणि चंद्राभोवती घिरट्या मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
१४ जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-३ ने शुक्रवारपर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले होते. यावेळी चांद्रयान-३ चंद्राभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. या घटनेकडे संपूर्ण देशासह जगभरातून सर्वांचे लक्ष आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…