Manipur : मणिपूर सरकारचा पाठिंबा मित्रपक्षाने काढला

Share

मणिपूर : गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार (Manipur violence) रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत येथील सरकारमधील एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

रविवारी रात्री पाठींबा काढण्याचा निर्णय घेऊन पक्षाने याची घोषणा देखिल केली आहे. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. राज्यामध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि तीन महिन्यांनंतरही परिस्थिती सामान्य होत नसल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमध्ये कुकी पीपल्स अलायन्सच्या दोन आमदारांचा समावेश होता.

४ मे २०२३ रोजी मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान भडकलेली हिंसा अद्याप थांबलेली नाही. तेव्हापासून मणिपूर हिंसेच्या आगीत होरपळत आहे. रविवारीही राज्यातील काही भागात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच सायंकाळी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक झाली आणि त्यानंतर हा टोकाचा निर्णय घेण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

6 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

7 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

8 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

10 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

11 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

11 hours ago