देवेंद्र फडणवीस यांचं शहांबाबत वेगळं मत, म्हणाले, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. पण,

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित दादा म्हणाले की अमित भाईंचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे, कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. पण, अमित भाईंचा जन्म मुंबईतील आहे, त्यांची कर्मभूमी जरी गुजरात आणि देश असली तरी, जन्मभूमी महाराष्ट्र आहे. तर, उद्योग व्यवसायात असताना सुरूवातील त्यांनी मुंबईतच स्वत:ची फॅक्टरी त्यांनी सुरू केली होती. त्यामुळे, त्यांची कर्मभूमी देखील काही काळासाठी महाराष्ट्र राहिली आहे. त्यामुळेच, महाराष्ट्रातून गेलेल्या डेलिगेशन्सला त्यांच्याकडून कायम सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असेही फडणवीसांनी सांगितले.


अजित पवार म्हणाले, देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास आहे. सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहोचला आहे. सहकार विभागाचे देशात मोठे योगदान आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे प्रत्येक गावात पोहोचले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका