Amit Shah to Ajit Pawar : अमित शहांनी अजितदादांना सांगितली 'ही' खास गोष्ट

भाषणाच्या सुरुवातीलाच केला अजित पवारांचा उल्लेख...


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शहा यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे (Sahkar se Samruddhi Portal) उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी एक खास गोष्ट सांगितली.


अमित शाह म्हणाले, 'सगळ्यात आधी अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत एकाच मंचावर येऊन कार्यक्रम करत आहे. त्यामुळे मी दादांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, बर्‍याच कालावधीनंतर तुम्ही योग्य जागेवर बसला आहात. हीच जागा योग्य होती मात्र तुम्ही खूप वेळ लावला', असं सूचक वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे.


पुण्यातील या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित आहेत. अमित शाह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगेल यात शंका नाही.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा