छत्रपती संभाजीनगर : तुमचे भोंगे सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता वाजणार आणि भोंग्यातून ‘सगळ्यांचा देव एकच अल्लाह’ एवढंच बोलून तुम्ही मोकळं होणार! तुम्ही आमच्या देवाचं नाव कधी घेणार नाही. वारंवार धर्मांतराच्या निमित्ताने आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, उंबरे मधील हिंदू मुलीसोबत घडलेली घटना या सगळ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राहुरी येथील आजच्या जनआक्रोश मोर्चात जबरदस्ती धर्मांतर घडवून आणणार्यांना चांगलीच चपराक लगावली.
नितेश राणे म्हणाले, ‘हे सर्व कोणाच्या राज्यात चालू आहे? हे काय पाकिस्तान आहे? हे काय काँग्रेसचं राज्य आहे? मुख्यमंत्री काय उद्धव ठाकरे बसलाय? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नगरचे पालकमंत्री कोण आहेत हे माहित नाही का? यांची नावं जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर रोज सकाळी उठून मी तुम्हाला गुड मॉर्निंगच्या निमित्ताने फोन करुन सांगेन. मग कोण वाचवायला येणार तुम्हाला? यावेळेस नितेश राणे यांचा रोख पोलीस प्रशासनात गैरवर्तन करणार्या काही अधिकार्यांवर होता.
पोलिस खात्यातले जे जे कोण मस्ती करणारे आहेत, मी सगळ्या पोलीस खात्यांवर आरोप करत नाही. पण मी विधानसभेत देखील आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना सांगितलं की डिपार्टमेंटमध्ये काही सडके आंबे आहेत. ते तुमचं नाव खराब करत आहेत, पोलीस दलाचंही नाव खराब करत आहेत. मला अॅडिशनल एस. पी. आय. स्वाती भोरताईंना विचारायचं आहे की, कोण वाचवायला येणार तुम्हाला? तुम्ही आमच्या मुलांबरोबर काय काय करता हे आम्हाला कळत नाही का? गृहमंत्री साहेबांपर्यंत तुमची माहिती पोहोचत नाही का? तुम्ही जबरदस्तीने आमच्या मुलांवर केसेस घ्यायला लावता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आठ-नऊ तास आमच्या मुलांना तुम्ही कोंबडा बनवून उभं करता, धमक्या देता असेही आरोप त्यांनी केले.
एवढंच धमक्या देता तर नावं घ्या की कोण फोन करतं तुम्हाला? कोण तुमचे वरिष्ठ आहेत? पहिलं नाव लिहा नितेश नारायण राणे. मी फोन करतो त्या मुलांसाठी. यानंतर नितेश राणे अॅडिशनल एसपी स्वाती भोर यांना उद्देशून म्हणाले, तुमच्या अधिकार क्षेत्रात येऊन मी तुम्हाला सांगतो की मी फोन करतो त्या मुलांसाठी आणि उद्याही मीच करणार, तुम्ही माझं काहीही वाकडं करु शकत नाही. हे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. हे भगवं सरकार आहे. इथे माझ्या कुठल्याही हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला कुणीही अगर कुठल्याही पद्धतीचा त्रास दिला तर सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आणि आमच्यापर्यंत पोहोचते म्हणजे आदरणीय देवेंद्रजींकडे नक्की पोहोचणार. मग तुम्हाला जे कोणी फोन करतात की चल मी तुझ्याबरोबर आहे त्यांना विचारा की तुम्हाला कोण किती वाचवू शकणार आहे? असे खडेबोल यावेळी नितेश राणे यांनी सुनावले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…