Jan Aakrosh Morcha in Rahuri : हिंदू बांधवांचा जनआक्रोश; राहुरी येथे काढण्यात आला मोर्चा... 

  230

भाजप आमदार नितेश राणे यांचाही सक्रिय सहभाग



छत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद (Love jihad) आणि धर्मांतराचा (Conversion) आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चासाठी वाय एम. सी. मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती. राहुरी शहरासोबतच राहुरी तालुक्यात कडकडीत बंद पाळ नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला.


वाय. एम. सी. मैदानावरुन या मोर्चास प्रारंभ झाला. यावेळेस मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या नाश्त्याची देखील सोय करण्यात आली होती. कोपरगाव, श्रीरंगपूर, संगमनेर या शहरांमध्ये यापूर्वी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता राहुरी येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चेकरांच्या हातात 'तू दुर्गा बन, तू काली बन, पर तू लव्ह जिहाद का शिकार ना बन', अशा अनेक घोषणांचे बॅनर्स होते.


'हिंदू बांधवांची जी एकात्मता आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. कुणाबद्दलही द्वेष नाही, मात्र हिंदूंची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे', अशी प्रतिक्रिया एका मोर्चेक-याने दिली. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी व हातात भगवे झेंडे होते. या मोर्चामुळे वाय. एम. सी. मैदानावर भगवं वादळ निर्माण झालं होतं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.


Comments
Add Comment

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या