50 khoke: 50 खोक्यांचे आरोप करणाऱ्यांनी, शिंदेना पाठवलं 50 कोटींच पत्र....

  144

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर सडकून टीका केली. महत्त्वाचं म्हणजे सभागृहात एक कागद दाखवून ठाकरे गटाकडून ५० कोटींसाठी पत्र आल्याचं सांगितलं.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी सुरु आहे, मागच्या सरकारमध्ये शासन आपल्या घरी होतं. मागच्या सरकारमध्ये सगळा दर्जा घसरला होता. शिक्षणाचा, गुंतवणुकीचा , विकासांचा दर्जा घसरला. असं असलं तरी टोमण्यांचा दर्जा वाढला होता. आम्ही तुम्हांला दोष देणारे नाहीत तर ठोस काम करणारे आहोत. शैक्षणिक विकासकामांबाबत सरकारने खंबीरपणे पावलं उचलली आहेत. गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची ३० हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत. तसेच साखर उद्योगाकरीता शासन पावलं उचलत आहे. उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून १२०० कोटी रुपयांची सबसीडी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


''आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हेसुद्ध बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे. आमच्याकडे खूप गोष्टी आहेत, बोलता येतील.'' ५० खोके-५० खोके तुम्ही करतात. आणि शिवसेनेच्या खात्यातले ५० कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा, असं पत्र मला पाठवतात. आम्हांला गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचं अन् ५० कोटींसाठी पत्र पाठवायचं.आता खरी शिवसेना कुणाकडे आहे, आपल्याकडे. तरीही मी त्यांचे पैसे देऊन टाका म्हटलं. आम्हांला काहीही नको, केवळ बाळासाहेबांचे विचार पाहिजेत आणि त्यांना पैशांचं पडलंय. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर आरोप केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये