मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) कायमस्वरुपी न्यायमूर्तीपदी (Justice) नियुक्ती करण्यात आलेल्या मात्र नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयात (Alahabad High court) बदली करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झालेल्या न्यायमूर्ती रोहित देव (Justice Rohit Deo) यांनी बदलीमुळे व्यथित होऊन कोर्टरुममध्येच राजीनामा दिला आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा (Resignation) देत असल्याचे जाहीर केले.
न्यायमूर्ती रोहित देव हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले. मात्र त्यांनी राजीनाम्याबद्दल घोषणा करताच सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, त्यांनी भावनिक होऊन आपले मन मोकळे करताना आपण सर्व एक परिवार आहोत आणि परिवाराचा विकास व्हावा हाच आपला नेहमी उद्देश होता, असं वकिलांना सांगितलं. तसंच, सर्वांना चांगले काम करत राहण्याचं आवाहन केले. त्यानंतर ते संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचं सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले.
न्या. रोहित देव नागपूरकर असून त्यांची ५ जून २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांना न्यायमूर्ती पदी कायम करण्यात आले होते. वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केल्यानंतर १९९० पासून त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी ३० वर्षांच्या वकिली व्यवसायात विविध प्रकारची प्रकरणे हाताळली होती.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…