मुंबई : भारतात कोरोनाचा (Corona) धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळती चालले असताना आता पुन्हा एकदा राज्यात रिएंट्री झाली आहे. (Re-entry of swine flu and influenza along with corona in the state) गेल्या २४ तासात राज्यात नवे २४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसते. याशिवाय, राज्यात स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) चे रुग्णही आढळून आले आहेत. सध्या राज्यात ९६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) चे ५२ रुग्ण आढळून आले आहेत.
स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) आणि कोरोना (corona) हे तिन्ही संसर्गजन्य रोग आहेत आणि विषाणूंद्वारे पसरतात. त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क लावून घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात कोरोनाचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ९६ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात मुंबईत २८, ठाणे २५, पालघर २, रायगड ७, सिंधुदुर्ग १, पुणे २९ रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात ११ कोरोना रुग्णांना डिस्चार्च देण्यात आला आहे. समाधानकारक बाब अशी कोरोनामुळे आज दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. सध्या फॅटिलिटी रेट हा १.८१ टक्के इतर आहेत. तर रिकव्हरी रेट ९१.१८ टक्के आहे.
सक्रीय रुग्णांपैकी सध्या होम आयसोलेशनमध्ये ७८ रुग्ण आहेत. तर रुग्णालयात ५ रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै ते १२ जुलैच्या दरम्यान राज्यात ७१ रुग्ण होते. त्यानंतर त्यात किंचीत वाढ झाली होती. त्यामुळं पुढच्या आठवड्यात म्हणजे, १३ जुलै ते १९ जुलै दरम्यान ७५ कोरोना रुग्ण आढळले होते. २० जुलै ते २७ जुलैच्या दरम्यान ७० रुग्ण आढळले आहेत. आता यात मोठी वाढ झाली असून २७ जुलै ते २ ऑगस्ट च्या दरम्यान ९६ रुग्ण आहेत.
कोरोनाची धोका वाढत असतांना स्वाइन फ्लू (H1N1), इन्फ्लुएंझा (H2N2) च्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. स्वाइन फ्लूच्या १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत ६८४ केसेस आढळून आल्या होत्या. या काळात ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर इन्फ्लुएंझाचे ९५० रुग्ण आढळून आले होते. काल स्वाइन फ्लूचे १५ तर इन्फ्लुएंझाचे ३७ रुग्ण आढळून आले.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…