Nitin Desai: नितीन देसाईंच्या 'त्या' ऑडिओ क्लीप्समध्ये महत्त्वाची माहिती ?PM मोदी आणि CM शिंदेंसाठी मेसेज

ऑडिओ क्लीप्समुळे नितीन देसाईंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार आहे.


चित्रपटसृष्टीतील सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई(Nitin Desai) यांनी बुधवारी पहाटे कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या या धक्कादायक एक्झिटमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. खालापूर पोलिसांनी एन.डी. स्टुडिओतील नितीन देसाई यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांना नितीन देसाई यांच्या मृतदेहाजवळ एक व्हॉईस रेकॉर्डर मिळाला होता. हा व्हॉईस रेकॉर्डरच नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी कुटुंबातील व्यक्तींबरोबरच आपल्या वकिलासाठी एक मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण ११ ऑडिओ क्लीप्स आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार' हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे.


यासोबतच नितीन देसाई(Nitin Desai) यांनी एका क्लीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे. एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावं अशी माझी इच्छा आहे. मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा. कारण एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे. आपण ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, यासाठी नितीन देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या मागण्यांसंदर्भात काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


नितीन देसाईंना कामं मिळू नये यामध्ये होता बड्या बॉलिवूड अभिनेत्याचा हात? विरोधात होती एक मोठी लॉबी?


नितीन देसाईंच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार?


विधानसभेत गुरुवारी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत चर्चा झाली. यावेळी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी केली. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओच्या ४३ एकर जमिनीवर १८० कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. या १८० कोटी रुपयांचे २५२ कोटी झाले. एडलवाईज समूहाचे सीईओ रसेश शहा यांच्या असेट रिक्रेशन कंपनीचे हे पहिले प्रकरण नाही. ही आधुनिक सावकारी आहे. असेट रिक्रेशन कंपनीने नितीन देसाई यांना दिलेल्या कर्जावर आकारलेल्या व्याजाचा दर आणि पद्धत याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित

मुंबई : महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आपल्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक

रेशन कार्डधारकांसाठी नवे नियम व अटी लागू; अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावले

वरळी सी लिंक वर २५० च्या स्पीडने पळवली लंबोर्गिनी; पोलिसांनी घडवली अद्दल

मुंबई : मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंकवर भरधाव वेगात आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने लॅम्बोर्गिनी उरूस चालवण्याचा

Pradnya Satav : 'राजीवभाऊंचे आशीर्वाद अन् देवाभाऊंची साथ'; प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं भरभरून कौतुक

मुंबई : गेल्या २४ तासांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर अखेर

Navnath Ban : 'संजय राऊत स्वतःला पक्षप्रमुख समजू लागलेत का?' भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघाती हल्ला

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार : नवनाथ बन मुंबई : शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या

Pradnya Satav : अखेर प्रज्ञा सातव यांनी हाती घेतलं कमळ! चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये पक्षप्रवेश

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ.