मुंबई : पार्ट टाईम काम (part time job) करण्यासाठी अंधेरीतील एका महिलेने तब्बल ७.८ लाख रुपये गमावल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाईन फसवणूक (online fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर या पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
अंधेरी (पूर्व) येथील सुभाष नगर येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेला २० जुलै रोजी मोबाईलवर एक मजकूर संदेश आला ज्यामध्ये तिला खाजगी कंपन्यांसाठी गुगलवर ‘रेटिंग’ उपलब्ध करून देण्यासाठी पार्टटाईम नोकरीची (part time work) ऑफर देण्यात आली. पीडित महिलेला वाटले की पैसे कमवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि तिने टेलिग्राम अॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला.
@ZzMithran आणि @ZzAshvil नावाच्या दोन चॅनेलमध्ये सामील झाल्यानंतर लगेच, तिला तिच्या बँक खात्याचे तपशील देण्यास सांगण्यात आले, त्यानंतर तिला सामील होण्याची रक्कम म्हणून २०० रुपये देण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २१ जुलै रोजी तिला प्रीपेड कार्यासाठी १००० रुपये पाठवण्यास सांगण्यात आले आणि ते पूर्ण झाल्यानंतर १३०० रुपये परत करण्याचे वचन दिले. पुढील कार्यासाठी, सिंधूने ५००० दिले आणि पूर्ण झाल्यानंतर, तिला ६६०० रुपये मिळाले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला पुन्हा ५००० रुपये भरण्यास सांगण्यात आले, परंतु यावेळी काम पूर्ण करूनही तिला रक्कम परत देण्यात आली नाही.
सिंधूने त्यांना पेमेंटबद्दल विचारले असता, सुरुवातीला तिला २७,००० रुपये देण्यास सांगण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी तिला दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन दिले, मात्र तसे काही झाले नाही. तिने त्यांना २७,००० रुपयांबद्दल विचारले तेव्हा तिला सर्व रक्कम तिच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आणखी ६०,००० रुपये देण्यास सांगण्यात आले. पण तरीही त्यांनी तिला काहीही दिले नाही.
फसवणूक करणाऱ्यांनी तिच्याकडे पुन्हा पुन्हा वेगवेगळी कारणे सांगून पैशाची मागणी केली. व ते पैसे परत करणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे शेवटी पीडित महिलेच्या लक्षात आले की तिने त्यांना ७.८ लाख रुपये दिले आहेत आणि त्याबदल्यात तिला काहीही मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तीन बँक खात्यांमधून केलेल्या व्यवहारांच्या प्रती देखील दिल्या. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…