Manipur Violence : '१४ दिवस का लावले? पोलीस काय करत होते?'

  149

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल


नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार (Manipur Violence) आणि महिलांवरील अत्याचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारले की, "४ मे रोजीच्या घटनेवर पोलिसांनी १८ मे रोजी एफआयआर नोंदवला. १४ दिवस काहीही का झाले नाही? १४ दिवस का लावले?' तसेच सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना देखील अनेक सवाल केले आहेत. 'हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन महिलांवर बलात्कार झाल्याची आणि त्यांची विवस्त्र धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. हे सगळं सुरू असताना पोलीस काय करत होते?' असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला आहे.


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे की, 'समजा १००० महिलांवरील गुन्हे आहेत. सीबीआय सर्वांची चौकशी करू शकणार आहे का?' यावर उत्तर देताना सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या एका महिला अधिकारी या तपासासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांनी सांगितले की, 'मंगळवारी सरकार प्रत्येक प्रकरणातील तथ्यांसह माहिती न्यायालयात हजर करेल.'


सरन्यायाधाशांनी एफआयआर विषयी देखील माहिती सादर करण्यास सांगितले आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, "आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की ६००० एफआयआरचे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे. किती झीरो एफआयआर आहेत, काय कारवाई करण्यात आली आहे, किती जणांना अटक करण्यात आली आहे? असे अनेक सवाल सर्वेच्च न्यायालयाने विचारले आहेत. तसेच या प्रकरणावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कलम ३७० नुसार या प्रकरणावर सुनावणी सुरु होणार आहे. यावर उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मंगळवार सकाळपर्यंत एफआयआरबद्दल सर्व माहिती उपलब्ध करणे कठिण आहे.


या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी सरकारला अनेक कठोर सवाल केले आहेत. पीडित महिलांचे जबाब कोण नोंदवणार? असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केला आहे. एक १९ वर्षीय महिला जी मदत शिबिरात आहे, तिचे वडिल आणि भाऊ मारले गेल्याने ती घाबरलेली आहे त्यामुळे तिला न्यायालयीने प्रक्रिया शक्य होईल का असा कठोर सवाल देखील त्यांनी विचारला आहे.



Comments
Add Comment

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी