पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार बॅटींग करणारा पाऊस रविवारी काहीसा शांत झाला आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. मात्र, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून कोकणातील रायगड आणि रत्नागिरीला, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तसंच विदर्भात पावसाचा वेग मंदावला असला तरीही काही भागांत अजूनही पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. राजधानी मुंबईतील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि काळोख होता. दुपारी काही वेळ आणि संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवला. रात्री साडेआठपर्यंत शहरात १.२ मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर जोराचा पाऊस पडला. पुढील काही दिवस पावसाचा जोर आता ओसरणार असल्याने शेतकऱ्यांना आता शेतीची कामे पूर्ण करता येतील, असे आयएमडीने सांगितले आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…