Asian game football: तीन भारतीय फुटबॉलपट्टूंना आशियाई क्रीडा स्पर्धेतून वगळले

तीन भारतीय फुटबॉलपट्टूंना आशियाई क्रीडा(Asian Games) स्पर्धेतून वगळले, केवळ २३ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश


भारतीय फुटबॉल संघाचे स्टार खेळाडू सुनील छेत्री, गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर) आणि संदेश झिंगन यांना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी संघात स्थान मिळालेले नाही. चीनमधील हांगझोऊ येथे ही स्पर्धा होणार आहे.


वयामुळे या खेळाडूंना आशियाई क्रीडा २०२३(Asian games 2023) मध्ये स्थान मिळाले नाही, असे एआयएफएफने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आशियाई क्रीडा २०२३ मधील फुटबॉल संघात प्रामुख्याने २३ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश असावा. पण, या तिन्ही खेळाडूंचे वय जास्त आहे.


आशियाई खेळ २०२३ मध्ये फक्त २३ वर्षांखालील खेळाडू फुटबॉल खेळत असल्याची माहिती आहे. याशिवाय एका संघात या वयापेक्षा जास्त तीन खेळाडूंनाही परवानगी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या पुरुष फुटबॉल संघात एकूण २२ खेळाडूंचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयओएआणि एआयएफएफ ने वैयक्तिकरित्या एशियाड आयोजकांना या खेळाडूंचा समावेश करण्यासाठी सूट देण्यास सांगितले आहे. आशियाई खेळ २३ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत खेळवले जातील.


पुरुष फुटबॉल संघ :
अन्वर अली, गुरमीत, लालेंगमाविया, नरेंद्र, रहीम अली, लालनंतलुआंगा बावित लुंग, रोहित दानू, प्रभसुखान सिंग गिल, अनिकेत अनिल जाधव, राहुल कन्नोली प्रवीण, अमरजीत सिंग कियाम, आकाश मिश्रा, धीरज सिंग मोइरांगथेम, महेंद्रसिंग, मोइरांगथेम, महेश सिंह. सिंग नौरेम, रोशन सिंग नौरेम, शिवशक्ती नारायणन, आशिष राय, विक्रम प्रताप सिंग, दीपक टांगरी, जॅक्सन सिंग थौनाओजम, सुरेश सिंग वांगजाम या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलवर टांगती तलवार मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी