Mumbai Metro : संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

  111

मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण


मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण


मुंबई : डी एन नगर ते मंडाळे दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या (Mumbai Metro) मेट्रो मार्ग २ ब च्या पियर्स आणि पियर कॅपची उभारणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असून देखील एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने चेंबूर येथील मुंबई मेट्रो मार्ग २ब च्या पॅकेज सी १०२ मध्ये पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे. या मर्गिकेची कामे ३ पॅकेज मध्ये सुरू आहे.


जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्स ची उभारणी करण्यात टीम ला यश आले असून आत्तापर्यंत ८३९ पैकी ४५० पियर कॅप्स ची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्यस्थितीतमेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. सारी मुंबई थकून शांतपणे विसावत असते तेव्हा मुंबईतील मेट्रोची टीम आपले काम अविरत आणि शांतपणे करते.


मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागामार्फत काही ठिकाणी रेड तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईची दळण वळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या त्रासमुक्त प्रवासासाठी प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पांची कामे मुसळधार पावसातही अविरत सुरू आहेत. मेट्रोची कामे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केली जातात. ज्यावेळेस मुंबई थांबलेली असते त्यावेळेस मेट्रोची टीम ही मुंबईकरांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत असते.


"मुसळधार पावसा सारख्या आव्हानात्मक हवामानात ही, मेट्रोची टीम मेट्रोची सर्व कामे उल्लेखनीय वेगाने करत आहे. ट्रॅफिक समस्यांचे निराकरण करताना पायलिंग, पाइल कॅप, खांबाचे काँक्रीटीरण आणि पिअर कॅपच्या कामांदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करून ही कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे." असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी, भा. प्र.से. म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची

Narayan Rane : "राज शिवसेनेत आला की, उद्धव ठाकरे नगण्य होणार"; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? : खासदार नारायण राणे मुंबई : “राज ठाकरे पुन्हा उद्धव

पुरावे दिले तर खुलासा करेन; राऊतांच्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंचे थेट आव्हान

आरोप करणे हा राऊतांचा नेहमीचा उद्योग - अमोल मिटकरी मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री

Prasad Lad : बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : विधान परिषदेत आज भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. लाड यांचं बनावट लेटरहेड वापरून

'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध